बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठी माणसाचा अपमान झाला तरी शिंदे आणि त्यांचे नेते गप्प का?”

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) आणि शिवसेना( Shivsena) यांच्यातील वाद काही नवा नाही. आता भगतसिंग कोश्यारी यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर राष्ट्रवादीने(NCP) आणि मनसेने देखील कोश्यारींवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतही(Sanjay Raut) आता कोश्यारींवर जोरदार टीका करत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी सोशल मिडीयावरून जोरदार संताप व्यक्त केला आहे. थोडा तरी अभिमान आणि स्वाभिमान असेल तर राज्यापालांनी राजीनामा द्यावा, अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊतांनी कोश्यारींवर राग व्यक्त केला आहे.

ब्रिटीश काळापासून मुंबईला आर्थिक वैभव प्राप्त झालं आहे. नानाशंकर शेट हे सच्चे मराठी प्रमी होते. नाना शंकर शेट यांनी मुंबईचं आर्थिक वैभव वाढवलं आहे. त्यांचं चरित्र आम्ही राज्यपालांना पाठवणार आहे. मुंबई आर्थिक राजधानी कशी झाली?, मुंबई आर्थिक विकासाचं मॉडेल कसं झालं हे राज्यपालांनी यातून जाणून घ्यावं, असं राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली, असं शिंदे गट सांगत आहे. मग आता मराठी माणसाचा अपमान झाला तरी शिंदे आणि त्यांचे नेते कसे गप्प आहेेत ?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचा घोर अपमान झाला तरी 50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसले आहेत, असा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

बाळासाहेबांचे दुसरे नातू शिंदे गटात सामील, उद्धव ठाकरेंना मोठा झटका

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, सुशांत सिंह राजपूतचाही केला उल्लेख

“उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या समस्या कशा समजणार?”

‘मला केंद्राची सुरक्षा आहे त्यामुळे…’; ‘त्या’ पत्रावर नवनीत राणांची प्रतिक्रिया

‘मी राजकारणासाठी दौरे करत नाही’ -अजित पवार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More