DYSP भाग्यश्री नवटकेंना जेलमध्ये टाका, अन्यथा हायकोर्टात जाणार!

बीड | आयपीएस अधिकारी आणि माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटकेंची बदली नको, तर त्यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची रवानगी जेलमध्ये करा, अशी मागणी बहुजन विकास आघाडीच्या बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. 

भाग्यश्री नवटके यांची एक वादग्रस्त क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये अॅट्रॉसिटीची तक्रार घेऊन आलेल्या दलितांना आपण कशी मारहाण करतो, हे सांगितल्याचं दिसत आहे. 

क्लीप व्हायरल झाल्यानंतर भाग्यश्री नवटके यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाने त्यांनी औरंगाबादला बदली केली आहे. 

बाबुराव पोटभरे यांनी मात्र यावर समाधानी नसल्याचं म्हटलंय. येत्या 8 दिवसात नवटकेंवर गुन्हा दाखल झाला नाही तर उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-आमदार अनिल गोटेंचा भाजपला आणखी एक मोठा धक्का

-गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहावे!

-रामराजे नाईक निंबाळकरांवर गुन्हा दाखल करा; आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-नारायण राणे संपले नाहीत अजून; विरोधकांनी लक्षात घ्यावं!

-धनगर आरक्षणासाठी भाजप खासदार रस्त्यावर; जाळला महायुतीचा वचननामा!