बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतंय”

मुंबई | काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांची एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप समोर आली होती. यानंतर मोठी खळबळ उडाली. याप्रकरणावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर जारकीहोळी यांनी राजीनामा दिला होती.

बदनामीसाठी राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा जारकीहोळींनी सुरुवातीला केला होता. अखेर जारकीहोळींना राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणावरून आता काँग्रेसने भाजपवर बोचरी टीका केली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी यावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक खोचक ट्विट केलं आहे. काँग्रेसने कर्नाटकाला IT Hub बनवलं. भाजप कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे, असं म्हणत भाई जगताप भाजपवर आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणलं. तसेच दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे

‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

“सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे”

न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट; पूजेचे फोटो केले शेअर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More