महाराष्ट्र मुंबई

“प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील”

Photo Credit- Bhai Jagtap Facebook

मुंबई | भक्त लोकांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला आहे की ते आपल्याविरोधात असणाऱ्या प्रत्येकाला टोकाचा विरोध करतील, असं मुंबेई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलंय.

साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले आणि त्यांनीही शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्तमंडळी त्यांनाही देशद्रोही, खलिस्तानी आणि काँग्रेसी म्हणायला कमी करणार नाहीत, असा टोला भाई जगताप यांनी भाजपला लगावला आहे.

भाई जगताप मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. भाई जगताप यांनी यावेळी बोलताना रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून परस्पर पैसे घेतले जात असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधलाय.

काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याने अशाप्रकारचं कृत्य केलं असतं तर मी थेट कारवाई केली असती, असं भाई जगताप म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा!

शरजील उस्मानीच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर उर्मिला मातोंडकरांचं रोखठोक मत, म्हणाल्या…

‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’; भाजपच्या या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

“लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला”

“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या