महाराष्ट्र मुंबई

“मोदी सरकारने गांधीजींचा चष्मा घेतला, पण त्यांचा दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत”

File Photo

मुंबई | भाजपने फक्त गांधीजींचा चष्मा घेतला, पण महात्मा गांधींची दृष्टी आणि देशाच्या प्रति दृष्टिकोन घेऊ शकले नाहीत, हे या देशाचे दुर्दैव आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेसतर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाई जगताप बोलत होते.

आदरांजली कार्यक्रमादरम्यान सकाळी 11 वाजता 2 मिनिटांचं मौन पाळलं गेलं. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थितीत होते.

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केलं. आम्ही मागणी केली आहे की, सकाळी 11 वाजता सायरन वाजवून 2 मिनिटांचे मौन पाळणे, ही निव्वळ प्रथा नाही तर या देशाप्रति, महात्मा गांधी यांच्या प्रति आपले कर्तव्य आहे, असं भाई जगताप म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला- तात्याराव लहाने

…अन् अजितदादांनी जुन्या मित्राला आस्थेनं विचारलं, “तुमची तब्येत बरी आहे ना?”

…तेव्हा तुमच्या मंत्र्यांना घरी पाठवलं हे विसरलात काय?- अण्णा हजारे

“कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं”

किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या