Top News महाराष्ट्र मुंबई

“2 टक्क्यांच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे चमचे अन् फडणवीस आता गप्प का?”

File Photo

मुंबई | कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईही कर्नाटकचीच असल्याचं वक्तव्य केलं. यावरून मुंबई काँग्रसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे गप्प का?, असा सवाल करत भाई जगताप यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या 2 टक्क्यांच्या अभिनेत्री कंगणाच्या समर्थनार्थ भाजप नेते आणि कार्यकर्ते उतरले होते. आता, कंगणाला झाशीची राणी संबोधणाऱ्या भाजपच्या चमच्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्याबद्दल बोलावं, आता गप्प का?, असा सवाल भाई जगताप यांनी केलाय.

मुंबईबद्दल भाजप नेत्याचं हे वक्तव्य आता तुम्हाला दिसत नाही का, हेच तुमचं मुंबई अन् महाराष्ट्राबद्दलचं प्रेम का. मी कडक शब्दात या नेत्यांचा निषेध करतो, असं भाई जगताप यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“मंत्री पब-पार्टीत गुंग, कार्यकर्ते ‘गोली मार भेजे में’ स्टाईलमध्ये”

‘मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय’; सामान घेऊन विमानतळावर पोहचली महिला

गाडीवर लोगो शिवसेनेचा; काम गुंडगिरीचं… बंदुक दाखवून केलं ओव्हरटेक

वडील रागावल्याने दहावीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

“राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या