महाराष्ट्र मुंबई

“राजभवनाचं सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून नामकरण करावं का?”

मुंबई | कंगणा आणि शिवसेना वादावरुन भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे जात आहेत.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजप नेत्यांच्या या भेटींवरून काँग्रेसचे माजी आमदार भाई जगताप यांनी भाजपला टोला लगावला आहे.

भाई जगताप यांनी राजभवनाचं नामकरण करण्याचं सूचवलं आहे. भाजप कार्यालय किंवा आरएसएस शाखा असं नाव राजभवनचं करावं, असा टोला भाई जगताप यांनी लगावला आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावतनेही राज्यपालांची भेट घेतली होती. तसेच एनडीए सरकारमधील मंत्री रामदास आठवलेंनीही राज्यापालांची भेट घेतली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच!

“सर्व खासगी रुग्णालये यापुढे सरकारनेच चालवावी”

मुंबई महापालिकेला खिसा करावा लागणार खाली?; नुकसान भरपाई म्हणून कंगणाने मागितले इतके कोटी

“हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?”

मी जाहीर करतो की आजपासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे- मदन शर्मा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या