बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाई जगतापांची पोलिसांना धक्काबुक्की; भाई जगतापांसह 50 जणांवर गुन्हा

मुंबई | सध्या पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. तर घरगूती सिलेंडरच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने ठिकठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी इंधन दरवाढी विरूद्धच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत गोरेगावात आंदोलन केलं. त्यावेळी प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं लक्षात आल्यानं आंदोलन सुरू असताना घटनास्थळी असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना थांबण्याच्या सूचना केल्या. आंदोलन बंद करा, असे सांगत असाल, तर आम्ही ऐकणार नाही. आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरू राहील, असं म्हणत त्यांनी पोलिसांशी वाद घातला.

एक काॅन्टेबल पुढे सरकत असताना जगताप यांनी त्याला मागे सारले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात भाई जगताप पोलिसांशी वाद घातलाना दिसत आहेत. तर त्यांच्या या कृत्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आंदोलना दरम्यान मुंबई पोलिसांच्या विरूद्ध देखील घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनावेळी अनेकजण विनामास्क होते. अशात कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आंदोलन केल्याप्रकरणी भाई जगताप यांच्यासह 50 कार्यकर्त्यांविरूद्ध 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला मारलंय”

“काय भाषा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा”

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पहिल्या टप्यात ‘या’ किल्ल्यांचा समावेश

“राजकारणात पैसाच बोलतोय मात्र शिवसेना लोकांच्या श्रीमंतीवर चालणारा पक्ष”

‘या’ जिल्ह्यातील तळीरामांसाठी खुशखबर; मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More