भोपाळ | मध्य प्रदेशमधील भाजप सरकारने अध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. त्यांच्यासह 5 अध्यात्मिक गुरुंनाही राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसनं भाजपवर टीकास्त्र सोडलंय. महाराजांच्या प्रतिमेचा फायदा घेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी 5 आध्यात्मिक गुरुंची समिती नेमण्यात आली होती. या समितीचे सदस्य म्हणून हा राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
- उपसभापतीपदाची ऑफर देऊ शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न?
- नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ लवकरच भाजपमध्ये विलीन होणार?
- …तर खासदार संजय राऊत राज्यसभेचे उपसभापती होतील!
Comments are closed.