बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! प्रसूतीसाठी महिलेची २३ किलोमीटरची पायपीट… नदीनाल्यातून, घनदाट जंगलातून प्रवास

भामरागड | कोरोनाच्या काळात मुंबई पुण्यासारख्या शहरातून आपल्या गावी पायपीट करणारे मजूरांचे तांडे पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. अशातच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. प्रसूतीसाठी नदी नाल्याच्या प्रवाहातून वाट काढत तब्बल 23 किमी प्रवास करण्याची वेळ या भागातील एका गर्भवतीवर आली आहे.

रोशनी पोदाडी ही २३ वर्षीय गर्भवती महिला भामरागडच्या नक्षलग्रस्त भागातील तुरेमर्का गावाची रहिवासी आहे. रोशनीला बाळंतपणासाठी घरापासून ४० किमी दूर लाहेरी प्राथमिक केंद्रात जाणं गरजेचं होतं. नदी नाल्याला ओलांडत आणि कच्चा रस्ता तुडवत,रोशनी कशीबशी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रित पोहचली. मात्र याठिकाणी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा असल्याचं समजलं.

शेवटी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या लोकबिरादरीच्या रुग्णालयात या महिलेला रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. डाॅ. अनघा आमटे यांनी यांनी रोशनीची प्रसूती केली. रोशनीला मुलगा झाला.

यानंतर महिलेला घरी सोडविण्यासाठी लोकबिरादरीची रुग्णवाहिका गेली मात्र मध्येच रस्ता बंद झाला. आता इथून पुढचा घनदाट व खाचाखळग्यांचा रस्ता पुन्हा या रोशनीनं आपल्या मुलाला घेऊन पायी पार पाडला.

ट्रेंडिंग बातम्या-

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

राज्यात आज 6555 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

महत्वाच्या बातम्या-

आतापर्यंत 25 लाख 77 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात…, अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण

रूग्णसंख्या वाढत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितली दिलासादायक बातमी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More