मुंबई | वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. आले तर प्रकाश आंबेडकर निवडून येतील, असा दावा ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे 48 उमेदवार उभे केले आहेत. पण 48 उमेदवारांपैकी कोणीही निवडून येणार नसल्याचं मुणगेकर यांनी म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरून प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले राजकारण करत आहेत, असा घणाघात मुणगेकर यांनी केला आहे
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांना न मानणारा दलित समाज आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची मतं कमी होणार नसल्याचं, मुणगेकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
-भाजपच्या गिरीश बापटांवर काँग्रेसचा अत्यंत गंभीर आरोप
-मला मत द्या नाहीतर तुम्हाला शाप देईन; साक्षी महाराजांचा इशारा
-समलैंगिक संबंधातून चिपळूण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याची हत्या
-भाजप असेपर्यंत काश्मीरला भारतापासून कोणीही वेगळं करु शकत नाही- अमित शहा
-पार्थ पवारांना पेड न्यूज प्रकरण भोवणार??
Comments are closed.