भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी!

भंडारा-गोंदिया | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट झाला आहे.

नाना पंचबुद्धे हे भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी गावातील रहिवासी असून त्यांनी याच क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. 

भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी इथे मतदान झालं होतं. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव केला होता.  आगामी निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादीनं कुकडे यांचं तिकीट कापलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपला फटका ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

-तलवारीने चेहऱ्यावर सपासप वार करुन धनंजय मुंडेंच्या समर्थकाची हत्या

-चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा मोदींवर घणाघात 

-देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो, तुम्ही दिलेला शब्द पार पाडला- उद्धव ठाकरे

-चेहऱ्यावर तलवारीने वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या