Top News नागपूर भंडारा महाराष्ट्र

अत्यंत हृदयद्रावक!!! सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू

भंडारा | भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला आग लागली. दुर्दैवाची बाब म्हणजे या आगीत 10 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्यानं कामावर असलेल्या स्टाफनं दार उघडून पाहिलं असता, आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तेव्हा याची माहिती तातडीने वरिष्ठांना देण्यात आली.

अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं. तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बाळांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

दरम्यान, संपूर्ण रुग्णालयाला पोलिसांनी वेढा घातला असून, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सकांसह अनेक अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. आरोग्य उपसंचालक संजय जयस्वालही भंडाऱ्यात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

रोहित शर्मावर शंका घेणं महागात; ‘त्या’ काकांना काढावी लागली अर्धी मिशी!

‘लस घेतलेल्या लाभार्थ्यांची अशी पटणार ओळख’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या