बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भन्नाट ऑफर! लस घेतली तर मिळणार ‘या’ गोष्टी मोफत

गांधीनगर | कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी लसीकरण घेण्यास समोर यावे म्हणून भन्नाट शक्कल लढवली जात आहे.

गुजरातमध्ये लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. गुजरातमधील अहमदावदच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तेथील झोपडपट्टी आणि गरिब लोकसंख्येच्या परिसरात लसीकरणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी लसीकरणासोबत भन्नाट ऑफर दिली आहे.

लसीकरण केल्यास एक लिटर गोडेतेल आणि इतर अनेक भेटवस्तू लकी ड्रॉ स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार अहमदावद नगरपालिकेनं ही योजना सुरू केली आहे. जेणेकरुन लोक जास्तीत पुढाकार घेत लसीकरण करतील.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे शिथिल होत असले तरी सर्वांनी खबरदारी बाळगावी अशा वारंवार सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत.

थोडक्यात बातम्या- 

अजब! ‘पैसे नव्हते तर कुलूप कशाला लावलं’, चोरीनंतर चोराने लिहीलेल्या चिठ्ठीचीच सर्वत्र चर्चा

‘ही’ सरकारी कंपनी वाटणार मोफत सिमकार्ड; वाचा सविस्तर

“हे तर मुलांचं राज्य आहे, मुलींचा सन्मान यांची संस्कृती नाही”

“खरं तर सरकारला काकांचं दुःख सतावतय म्हणून ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा”

‘शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं’; चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More