बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर सिनेमाचं तिकिट आणि पाॅपकाॅर्न मिळणार फ्री’; पीव्हीआरची भन्नाट ऑफर

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला लक्षात घेता, त्याला रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावला गेला आहे आणि लोकांच्या संचारावर आळा घालण्यात आला आहे. या कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे अनेकांना घरूनच काम करावं लागत आहे. लाॅकडाऊनमुळे बाहेर फिरण्यात येत नसल्यामुळे घरी राहून अनेकजण कंटाळले आहेत. अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि सिनेमागृह बंद केले होते. मात्र आता कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे हळूहळू कोरोनाचे नियम शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे लोक आता बाहेर पडत असून आपला विरंगूळा करण्याची संधी शोधत असतात. आता मनोरंजनासाठी चित्रपटगृहेही खुले होत असल्यामुळे तुमची मनोरंजनाची मजा ही दुप्पट होणार आहे.

पीव्हीआर सिनेमानं आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक भन्नाट ऑफर सुरु केली असून ते लोकांना सिनेमाची तिकिटं मोफत देणार आहे. यासोबत पाॅपकाॅर्नही फ्री मिळणार आहे. या ऑफरचा आस्वाद घ्यायचा असेल तर यासाठी एक अट आहे. ती म्हणजे सिनेमा पाहायला आलेल्या व्यक्तीनं कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतलेले हवे. दोन्ही डोस जर घेतले असेल तरच तु्म्हाला मोफतमध्ये तिकीट आणि पाॅपकाॅर्न भेटणार आहे.

दरम्यान, या भन्नाट ऑफरचा आस्वाद तुम्हाला 12 ऑगस्टपर्यंतच घेता येणार आहे. ज्याठिकाणी पीव्हीआरचे सिनेमागृह आहे अशा ठिकाणी ही ऑफर तुम्हाला भेटणार आहे. फक्त तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि पाॅंडेचरी वगळता बाकी सर्व सिनेमांगृहांमध्ये तुम्हाला ही ऑफर भेटणार आहे. पीव्हीआरनं या ऑफरला JAB असं नाव दिलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार’; इम्तियाज जलिल यांचा इशारा

लस घेतल्यानंतर तुम्ही ‘इतके’ दिवस सुरक्षित राहणार; एम्सच्या डाॅक्टरांनी दिली महत्वाची माहिती

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोदी सरकारचं कौतुक; काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

‘…अन्यथा पैसे काढता येणार नाहीत’; पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More