बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भन्नाट ऑफर! लस घेतल्यास पब आणि बारमध्ये मिळणार 50% सूट

नवी दिल्ली | कोरनानं देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहिम राबवली जात आहे. कोरोना लस घेण्याबाबत अजूनही अनेक लोक नकार देताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी लस न घेणाऱ्यासांठी लस घ्यावी म्हणून वेगवेगळ्या आॅफर्स दिल्या जात आहेत. अशातच दिल्लीतील एका रेस्टॉरंट मालकानं अशीच एक बन्नाट आॅफर दिल्याचं समोर आलं आहे.

राजधानी दिल्लीतील सायबर सिटी असलेल्या गुरुग्राममध्ये एका पब आणि बार मालकाने कोविडची दुसरी लाट ओसरताच भन्नाट आॅफर सुरू केली आहे. ज्या नागरिकांनी, ग्राहकांनी लसीकरण पूर्ण केले आहे, म्हणजेच कोरोनावरील लशींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना बिलामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे, असं रेस्टॉरंटचे मालक युधवीरसिंग यांनी म्हटलं आहे.

ज्या ग्राहकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना बिलात 25 टक्के सूट देण्यात येईल. कोरोना कालवधीनंतर ग्राहकांना आकर्षित करुन केवळ व्यवसाय वाढीसाठी ही आॅफर नसून, ग्राहकांची सुरक्षितता आणि काळजी हाही या मागचा उद्देश असल्याचं युधवीरसिंग यांनी म्हटलं.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनचे शिथिल होत असले तरी सर्वांनी खबरदारी बाळगावी अशा वारंवार सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत.

थोडक्यात बातम्या – 

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

…म्हणून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना आम्ही 4 लाख देऊ शकत नाही- केंद्र सरकार

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करणं आवश्यक – अजित पवार

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाही, मग महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More