बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांवर ट्रायल सुरू होण्याआधी Bharat biotech ने केली मोठी घोषणा!

हैदराबाद | नुकतंच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनपैकी कोणती लस प्रभावी याबाबत संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यानंतर आता कोवॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा पूर्ण डेटा जारी करण्याच्या तयारीत आहे. जुलैमध्येच हा डेटा सार्वजनिक केला जाईल, अशी घोषणा कंपनीने केली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सर्वात आधी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे पाठवला जाईल. त्याआधी पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध होईल. त्याच्या तीन महिन्यांत हा डेटा सीडीएससीओला पाठवला जाईल. त्यानंतर हा डेटा जुलैमध्ये सार्वजनिक केला जाईल, असं भारत बायोटेकनं सांगितलंय.

दरम्यान, कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतिम विश्लेषण उपलब्ध असेल तेव्हा कंपनी फूल लायन्सेन्ससाठी अर्ज करणार आहे, असं कंपनीनं सांगितलं. या लशीचं लहान मुलांवरही क्लिनिकल ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. यासाठीदेखील मंजुरी मिळालेली आहे.

थोडक्यात बातम्या- 

शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात

घरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा!

“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More