बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वो क्या धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया’ -भरत गोगावले

मुंबई । राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. यंदाच्या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर चांगलेच बरसले. आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मात्र नेत्यांमध्ये हाणामारीसुद्धा पाहायला मिळाली.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर माध्यमांना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी हिंदीमध्ये प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘अरे हाड वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया’. यामुळे राजकारणातील तणावपूर्वक वातावरणात एकच हशा पिकला.

‘आम्ही कोणाला पाय लावत नाही, चुकून लागला तर नमस्कार करतो. पण आम्हाला कोणी पाय लावला तर सोडणार नाही. अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही’ असा इशाराही भरत गोगावले यांनी विरोधकांना दिला.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More