Top News मनोरंजन

‘आई बहिणीवरून त्यांनी वडिलांना शिव्या दिल्या पण…’; वडिलांच्या आठवणीत भरत जाधवची भावूक पोस्ट

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भरत जाधवने आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट केली आहे. आपल्या वडिलांचा अपमान झाला होता तेव्हाची गोष्ट भरतने पोस्टमधून सांगितली आहे.

भरत जाधवच्या वडिलांच्या टॅक्सीमध्ये प्रवासी बसले होते. ते प्रवासी एक नाटक पाहण्यासाठी चालले होते. जायला उशिर होत असल्यामुळे प्रवाशांनी भरत जाधवच्या वडिलांसोबत हुज्जत घातली आणि त्यांना शिव्याही दिल्या. मात्र भरतच्या वडिलांनी त्या प्रवाशांना अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून गेले. रात्री घरी आल्यावर त्यांनी हा सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर भरत जाधवने सांगितलं की ते प्रवासी ‘ऑल द बेस्ट’ च्या प्रयोगाला चालले होते!, या एका गोष्टीसाठी भरतच्या वडिलांनी अपमान मुकाटपणे सहन केला. त्यानंतर भरतने सांगितलं की, त्याने वडिलांन टॅक्सी चालवू नका असं सांगितलं त्यावेळी भरतला 100 रुपये नाईट मिळत होती.

ज्यावेळेस भरतने पहिली गाडी घेतली ती होंजा अॅकॉर्ड आणि वडिलांना स्टेरिंगवर बसवलं तेव्हा दोघा बापलेकांना खुप भरून आल्याचं भरतने सांगितलं. भरत आजही त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्या टॅक्सीचा फोटो लावलेला आहे.  अण्णा… आज तुम्हाला खुप मिस करतोय. तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पाहिला नाही, असं भरतने शेवटला म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“या तीन पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष”

“आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?”

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात हेच राहायला हवे- यशोमती ठाकूर

‘नायक’ सिनेमाप्रमाणे ही तरूणी ‘या’ राज्याची या दिवशी होणार एक दिवसाची मुख्यमंत्री

अरे काय चाललंय काय?, महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या