देश

“‘भारतरत्न’ हा तर सवर्ण आणि ब्राम्हणांचा क्लब”

नवी दिल्ली | एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसींनी भारताच्या सर्वोच्च पुरस्कारावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘भारतरत्न’ म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचं वादग्रस्त वक्तव्य ओवेसी यांनी केलं आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी हे विधान केलं. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने 3 व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. 

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावर चर्चा सुरू असताना मोदी सरकारनं जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांवर ओवैसींनी टीका केली.  

दरम्यान, गेल्या महिन्यातही ओवैसींनी नागरी पुरस्कांवरुन मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला होता. किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

-महत्वाच्या बातम्या-

-पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना न्यायालयाचे आदेश

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विरेंद्र सेहवाग म्हणतो…

बारामतीतून राष्ट्रवादीच्या विरोधात मीच दंड थोपटणार- महादेव जानकर

राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रत्यक्ष सहभाग- राहुल गांधी

-भाजप पुनम महाजन आणि किरीट सोमय्यांचं तिकीट कापणार??

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या