नागपूर महाराष्ट्र

DYSP च्या निष्काळजीपणामुळे 16 जवानांचा मृत्यू; वीरपत्नीचा गंभीर आरोप

गडचिरोली | गडचिरोलीतील डीवायएसपी शैलेश काळे यांच्या निष्काळजीपणामुळे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 16 जवानांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप शहीद जवान राजू नारायण गायकवाड यांची पत्नी भारती गायकवाड यांनी केला आहे.

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी एका वाहनाची जाळपोळ केली होती, पण घटनास्थळ 2 किमी अंतरावर असताना जवानांना खासगी वाहनाने का आणि कशासाठी नेण्यात आलं?, असा सवाल वीरपत्नीने उपस्थित केला आहे.

जवान कुठेही जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांची परवानगी घेणं बंधणकारक असतं, मात्र हल्ल्यादरम्यान कोणतीही पूर्वपरवाणगी घेण्यात आली नव्हती, असं भारती गायकवाड यांनी म्हटलं आहे.

गडचिरोलीतील उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी थोडी काळजी घेतली असती तर आज आम्हा 16 जवानांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसलं गेलं नसतं, अशी भावना वीरपत्नीने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-राजीव गांधींना ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणणं मोदींना पडलं महागात; काँग्रेसने दाखल केली तक्रार

-“‘या’ नेत्याला पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन; उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती धमकी”

-‘या’ नेत्याला पक्षात ठेवल्यास बायकोसह घर सोडेन; उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती धमकी

-कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? समजेल 23 तारखेला- अमित शहा

-देश अशा अहंकाराला माफ करणार नाही; प्रियांका गांधींचा पुन्हा मोदींवर पलटवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या