बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दौपदी मुर्मूंवरील ‘त्या’ टीकेमुळे भारती पवार संतापल्या, म्हणाल्या…

नवी दिल्ली | नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) म्हणजेच भाजपच्या उमेदवार दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या त्यांचे स्पर्धक यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यावर मात करून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशाच्या पंधराव्या तर प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्यानंतर दुसऱ्या महिला राष्ट्रपती (President of India) झाल्या आहेत. तसेच त्या आदिवासी (Tribal) समाजातील पहिल्या राष्ट्रपती आहेत.

आता त्यांच्यावर रबरस्टँम राष्ट्रपती (Rubber stamp President) किंवा शिक्काच्या राष्ट्रपती म्हणणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी उत्तर दिले आहे. एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना त्यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. जुन्या मानसिकतेतून बाहेर पडा, असे त्या म्हणाल्या. हा एक ऐतिहासिक निर्णय असून सोनेरी क्षण आहे. आदिवासी समाजातील आमची माता राष्ट्रपती होईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती, असेही पवार म्हणाल्या.

दौपदी मुर्मू यांना अधिक मते मिळतील अशी आम्हाला आशा होती, पण विरोधकांनी राजकारण बाजूला ठेऊन आदिवासी समाजाला प्राधान्य द्यायला हवे होते. ते त्यांनी दिले नाही. फक्त भाषणांमध्ये आदिवासी विकासाच्या गोष्टी आणि गप्पा करायच्या, प्रत्यक्षात आदिवासी राष्ट्रपती होत असताना, त्याला पाठींबा न देता राजकाराण करायचे, असेही यावेळी पवार म्हणाल्या.

दरम्यान, विरोधकांनी मुर्मू यांचा इतिहास वाचायला पाहिजे. भारतमाता आणि समाजसेवेसाठी त्यांनी खूप समर्पन दिले आहे. त्यांनी विनावेतन शाळेत मुलांना शिकविण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना रबरस्टँप वैगरे म्हणने या संकल्पना आता गेल्या आहेत. आता ते दिवस गेले आहेत, असं वक्तव्य भारती पवार यांनी केलं.

थोडक्यात बातम्या –

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘… नाहीतर आम्ही एकमेकांचा जीव घेतला असता’, नागा चैत्यन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथा स्पष्टच बोलली

जम्बो कोविड सेंटरबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

‘…त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची का?’, सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

मॅगझीनसाठी रणवीर सिंग झाला विवस्त्र, न्यूड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More