Top News पुणे महाराष्ट्र

“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का?”, या नेत्याला अजितदादांचा टोला

इंदापूर | भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का मी  कधी घालतो का, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नविन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकार, कोरोना, इंदापूर, जीएसटी या विषयांवरही पवारांनी भाष्य केलं आहे. त्यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बॅंक चालवता येत नाही. काय चाललंय?, असा सवालही पवारांनी हर्षवर्धन पाटलांना केला.

दरम्यान, अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर गेेले. राज्यात कोणाचीही सत्ता आली तरी कामं सुरुच राहिली पाहिजेत, असं पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…

अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

अर्जुन तेंडुलकर आता आयपीएलमध्येही खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधित्व करण्याची चर्चा!

‘मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण…’; लग्नाविषयी रतन टाटांचा मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या