उद्धव ठाकरेंना धक्का, लोकसभेला उमेदवारी दिलेल्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Bharti Kamdi left Uddhav Thackeray group 

Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. पालघरमध्ये शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय.पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाच्या लोकसभा निवडणूक 2024 च्या उमेदवार भारती कामडी (Bharti Kamdi) यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. (Uddhav Thackeray )

भारती कामडी यांच्यासह पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांनीही शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. निवडणुका जवळ आल्या असताना उद्धव ठाकरे यांना हा धक्का बसला आहे.

कोण आहेत भारती कामडी?

भारती कामडी यांना लोकसभेत ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती. त्यांना चार लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. 2020 मध्ये त्यांची पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. येथे त्यांनी दीड वर्ष काम केलं. सध्या त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या महिला संघटिका आहेत. मात्र, त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केलाय. (Uddhav Thackeray )

पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला होता. सावरा यांना 6 लाख 1 हजार 244 मतं मिळाली. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळाली होती.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघासाठी राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलून येथे राजेंद्र गावित यांना तिकीट देण्यात आलंय. (Uddhav Thackeray )

News Title –  Bharti Kamdi left Uddhav Thackeray group 

महत्त्वाच्या बातम्या-

दरवाढीचं सत्र सुरूच, सोनं पुन्हा महागलं; जाणून घ्या आजच्या किमती

‘…नाहीतर बुक्कीत टेंगूळ निघेल’; रूपाली ठोंबरेंचा सदाभाऊ खोतांना इशारा

आज देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशी होणार धनवान?, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांचा काँग्रेसला झटका!

अजित पवारांना पक्ष चिन्हावरून मोठा झटका!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .