मुंबई | कॉमेडियन भारती सिंहला अटक करण्यात आली आहे. तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाची गेल्या पाच तासांपासून चौकशी सुरु आहे.
भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीयाला NCB ने आधी समन्स बजावले होते. NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली.
भारती सिंहच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतलं. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे तर तिचा नवरा हर्षची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, एनसीबीने आज खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आलं.
महत्वाच्या बातम्या-
“हिंदुत्वावर संकट ओढावलेलं असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?, ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा करा”
पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार!
“राज्यपाल नियुक्त आमदारकी म्हणजे नेत्यांची सोय लावण्याची जागा नाही”
“मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर सुपुत्राला बार आणि पबची”
मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!