रत्नागिरी | शिवसेना नेते भास्कर जाधवा यांची नाराजी कायम असल्याचं दिसत आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन सध्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यातील विसंवाद समोर आला आहे.
उदय सामंत यांनी कोकणासाठीच्या स्वतंत्र विद्यापीठासाठी कमिटी नेमल्याचं जाहिर केलं. मात्र भास्कर जाधव यांनी थेट विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करुन सामंत यांना चितपट केलं. सावंत यांनी अशी कोणतीही समिती स्थापन केली नाही नसल्याचं स्पष्ट करण्याची नामुष्की आली.
राष्ट्रवादीत असल्यापासून उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव सध्या नाराज आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राजशिष्ठाचार पाळला गेला नाही म्हणून भास्कर जाधवांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता कोकण विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन त्यांची नाराजी कायम असल्याचं दिसत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
आजकाल शाळा कुणाचंच ऐकत नाहीत पण… – देवेंद्र फडणवीस
गृहमंत्री अमित शहांनी तात्काळ राजीनामा द्यावा- नवाब मलिक
महत्वाच्या बातम्या-
“मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल पण कारट्यानं नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली”
ठाकरे सरकार मराठा तरूणांना न्याय देण्यास असमर्थ- चंद्रकांत पाटील
अमृता फडणवीसांना वेळीच तोंड आवरायला सांगा आवरा; शिवसेनेचं थेट भैय्याजी जोशींना पत्र
Comments are closed.