बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही’; भास्कर जाधवांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

मुंबई | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. यानंतर भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात, अशी बोचरी टीका आमदार नितेश राणेंनी केली. त्यांच्या या टीकेला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर टीका केलीये. तसेच त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून काही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरून आमचे सहकारी लढले आहेत. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून विधानसभेत गोंधळ झाला. यानंतर भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

थोडक्यात बातम्या- 

विधिमंडळातील हे 12 सदस्य उत्कृष्ट संसदपटू, भाषण पुरस्कारांनी सन्मानित!

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘या’ वयोगटातील लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; महत्वाची माहिती आली समोर

हिवाळी अधिवेशनाची तारिख ठरली; ‘या’ तारखेपासून नागपूरात होणार अधिवेशन

“तुम्ही 19 आमदारांचं निलंबन केलं तेव्हा काय लोकशाहीचं सामूहिक हत्याकांड होतं काय?”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More