बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर शिंदे साहेब महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’, शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

मुंबई | विधानसभेत सुरु असलेल्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक प्रस्तावावर भाजप व शिंदे गट 164 मतांनी विजयी झाला. काल (03 जुलै) रोजी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक प्रस्तावावर अभिनंदनाची भाषणे सुरु आहेत. त्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेेंना भावनिक आवाहन केले.

एकनाथ शिंदे साहेब भाजप तुम्हाला लढवत आहे, शिवसेनेत रक्तपात होईल, शिवसैनिक घायाळ होतील. भाजपचा 25 वर्षांचा इतिहास पहाता, शिवसेना संपविणे हा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. तुमच्यावर यांचे प्रेम नाही. तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचविण्यासाठी दोन पावले मागे या. जर तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, असे भावनिक आवाहन भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केेले.

जाधव पुढे म्हणाले, संजय राठोड यांचे मंत्रिपद घालविण्यासाठी तुम्ही आंदोलन केले, आता संजय राठोड यांचे काय करणार आहात? यामिनी जाधव यांची चौकशी लावली, आणि आज त्यांनाच सुरक्षा दिली जात आहे, अशी विचारणाही भाजप आणि एकनाथ शिंदे यांना भास्कर जाधवांनी यावेळी आपल्या अभिनंदनाच्या भाषणात केली.

पानिपतच्या लढाईत जे झाले ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशहासाठी महाराष्ट्रात युद्ध चालू आहे, महाराष्ट्र लढत आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती, सरकार उलथवून टाकण्याची होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, भोंगा दिला, नुपूर शर्मा, कंगणा आणली.पण सत्तेला तडा गेला नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

‘… तर नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था होईल’ -देवेंद्र फडणवीस

“आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी परिस्थिती होती मात्र…”

कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी भडकले, वाचा सविस्तर

मोठी बातमी! बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

‘छमिया नाच रे’, सेहवागची विराट कोहलीवर खालच्या भाषेत टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More