बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा, भास्कर जाधवांवर फडणवीस संतापले

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधानांवरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदाराने पंतप्रधानांची नक्कल केल्याने वातावरण चांगलच तापलं.

शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची नक्कल केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेच संतापले. माफी मागा नाहीतर हक्कभंग प्रस्ताव आणू, असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला आहे.

पंतप्रधानांचा असा अपमान सहन केला जाणार नाही म्हणत फडणवीस आक्रमक झाले. देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची देखील मागणी केली आहे. ‘जाधव यांनी अंगविक्षेप केल्याचं मान्य केलं आहे तर त्यांनी माफी मागावी’, अशी मागणी फडणवीसांनी केली.

दरम्यान, ‘पंतप्रधानांचं केलेलं अंगविक्षेप मागे घेतो पण मी माफी मागू शकत नाही’, असं भास्कर जाधव म्हणाले.भास्कर जाधव यांनी माफी मागायला नकार दिल्याने विरोधक अधिक आक्रमक झाले. गोंधळ वाढल्याने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज स्थगित केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

हिवाळी अधिवेशन: ‘त्या’ 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी भाजपकडून अध्यक्षांना अर्ज

हिवाळी अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांची ‘ही’ मागणी अजित पवारांनी केली मान्य

हिवाळी अधिवेशन: “लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पहिल्यांदाच पाहिला”

Omicron: ‘..तर शाळा पुन्हा बंद होऊ शकतात’; वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विधानसभेत ‘इतके’ जण कोरोना पॉझिटीव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More