बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत नाहीतर…”

मुंबई | दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीनंतर शिवसेना विरुद्ध भाजप वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप चालूच आहेत. अशातच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी या वाकयुद्धात उडी घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागलली आहे.

कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. सावर्डे येथील एका दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेचं बोट धरुन भाजपवाले मोठे झाले आहेत. 1984 साली तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झालात. बाळासाहेबांचे फोटो लावून महाराष्ट्रात तुम्ही तुमचा पक्ष वाढवला.

गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले होते. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की, वाटेल ते झाले तरी चालेल पण नरेंद्र मोदींना बदलायचे नाही. बाळासाहेबांमुळेच मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते, असं भास्कर जाधव यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार सारखेच”

कोरोनातून बरं करण्यासाठी स्टेरॉईडस् दिलेल्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी समोर!

“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…

“उद्धव ठाकरेंच्या जोरदार भाषणामुळे विरोधकांना चिलमीत गांजा भरुन दम मारो दम करावं लागलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More