भास्कर जाधवांसाठी तटकरेंची माघार; निवडून आणण्यासाठी काम करणार!

मुंबई | भास्कर जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट भास्कर जाधवांना मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. 

भास्कर जाधव यांनी लोकसभेचं तिकीट देण्याची मागणी केली होती. तर जिल्हा पातळीवरुन सुनील तटकरे यांचं नाव आलं होतं. 

भास्कर जाधव यांची इच्छा असेल तर मी माघार घेतो. पक्षाने त्यांना संधी द्यावी आम्ही काम करु, असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याचं कळतंय. 

दरम्यान, राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक सुरु आहे. लोकसभा निवडणुकींच्या जागासंदर्भात चर्चा करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार का?; राष्ट्रवादीचा मोठा खुलासा

-…मग सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी?; पार्थच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध

-भारतापुढे विंडीज सपशेल फेल; भारतानं फॉलोऑन लादला

-एकनाथ खडसेंना यावेळी तरी मंत्रिपद मिळणार का?

-मंत्रिमंडळातून कुणाला मिळणार डच्चू अन् कुणाचा होणार समावेश?