बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भास्कर जाधव यांनीच आईवरुन शिवी दिली’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई | मुंबईत दोन दिवसाचं विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये अनेक मुद्यांवरून सभागृहात वादावाद झाला. पहिल्याच दिवशी विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यामुळे भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या असं तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी म्हटलं होत. याउलट भास्कर जाधव यांनीच आईवरुन शिवी दिली असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज चंद्रकांत पाटील यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली. आमच्या कार्यकर्त्याने जे काही म्हटलं असेल तर ते सरकारला म्हटलं असेल. सरकार हरामखोर वैगेरे, पण भास्कर जाधव यांना तुम्ही असं कोणी म्हटलं नाही. परंतू तरीही भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.

हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं बोलायचं एक आणि करायचं एक होतील असं माझ्यासारख्या व्यक्तीने अपेक्षित केलं नव्हतं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

जळगाव महापालिकेत खळबळ; नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का

…असं काहीतरी होणारच होतं, कारण ईडी ही भाजपची प्रेयसी आहे- अमोल मिटकरी

दिलीप कुमार यांचं निधन हे आपल्यासाठी एक सांस्कृतिक नुकसान आहे- नरेंद्र मोदी

‘युसूफ खान ते दिलीप कुमार’; वाचा हिंदी सिनेसृष्टीच्या पहिला सुपरस्टारचा प्रवास

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना सर्वात मोठा दणका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More