रत्नागिरी | देशात महागाई गगनाला भिडली आहे. वाढत्या महागाईवरून आता केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जात आहे. महागाई आणि नोटबंदीचा मुद्दा उचलून धरत शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रातील भाजप सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
खेड येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भास्कर जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काही केलंय का? असं मोदींनी 2014 मध्ये विचारलं होतं. तेव्हा मोदींच्या प्रश्नाला लोकही म्हणाले काहीच नाही केलं आणि मग जनतेनं मोदींना पंतप्रधान केलं, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
देशाची सत्ता हातात येताच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं देशातील एक एक गोष्ट हळूहळू विकायला सुरूवात केली. लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी देशच विकायला काढला, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. आता तर लोकंही त्यांना म्हणतात राजा विकणं बंद करा, असंही जाधव म्हणाले.
महागाईचा मुद्दा उचलून धरत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे. नोटबंदी करून प्रत्यक्षात काहीच हाती लागलं नाही. भाजपपेक्षा काँग्रेस बरं होतं अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली असल्याची टीकाही भास्कर जाधवांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“…तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही, कारवाई करेल”
SIT चौकशी दरम्यान किरण गोसावी संबंधी धक्कादायक माहिती आली समोर!
मोठी बातमी! दहशतवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर हादरलं
“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”
“पोलिसांना कलेक्शनसाठी वापरता मग ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?”
Comments are closed.