बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांसह भाजपचे सगळे आमदार माझ्या एकट्यावर तुटून पडले”

मुंबई | आज मुंबईत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये गदारोळ झालेला पाहायला मिळाला. यामध्ये तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षातील आमदारांवर शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं आहे. भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष अध्यक्षांच्या दालनात बसतात आणि काही त्यातून मार्ग काढतात या उद्देशाने कुणीही न सांगता दहा मिनिटांसाठी मी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं. कारण मला देखील इतक्या वर्षांचा अनुभव आहे आणि मी नुसता अध्यक्षांच्या दालनात आलो, तर त्यावेळी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सगळे वरिष्ठ आमदार आणि नवनिर्वाचित आमदार हे सगळे माझ्या एकट्यावर तुटून पडल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

सभागृहात आज जे घडलं ते लांछनास्पद आणि महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारं आहे. विधानसभेतील काही सदस्यांनी मला आई बहिणीवरुन शिव्या दिल्या आहेत, असा गंभीर आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे.

दरम्यान, दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

अशा कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सहन करु, पण…- रावसाहेब दानवे

शशी कपूर यांचा नातू लवकरच करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

अबब..! चांदीच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ; वाचा सोन्या-चांदीचे ताजे दर

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More