बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव

मुंबई | शिवसेना आणि राणे पिता-पुत्रांमध्ये कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरून खडाजंगी पाहायला मिळते. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी राणे पिता-पुत्र सोडत नाहीत. अशातच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर जहरी टीका केली आहे.

नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं भास्कर जाधव म्हणाले. लोकशाही या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राणेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात, मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाही. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नसल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना वाढीमध्ये नारायण राणेंचा काढीभर हात नाही. राणे गेले तेव्हा शिवसेनेचे 9 आमदार घेऊन गेले. त्यातील एकlरी आमदार दुसऱ्या निवडणुकीत आला का?, ते स्वत: तरी आले का निवडून आले का?, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चिपळूण दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना झापत, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भाजप-मनसे एकत्र येणार का?; राज ठाकरे म्हणतात…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयची मोठी कारवाई!

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी अनेकदा हुकली – देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More