“कोण हा फडतूस रवी राणा?, प्रश्न जर सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या…”
मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला असताना आता राणा दाम्पत्यामुळं संघर्ष उद्धवला आहे. राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा म्हणण्याच्या घोषणेमुळं संघर्ष निर्माण झाला. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या घराबाहेर हनुमान चालीसाचा गोंधळ केल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रवी राणांवर जोरदार टीका केली आहे.
कोण हा फडतूस रवी राणा, कुठं होता, असं जाधव म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी तुझ्यासारख्या माणसाला कधीच शिवसेनेत घेतलं नसतं. हनुमान चालीसा वाचण्यामुळं जर प्रश्न सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचावी, असा सल्ला भास्कर जाधवांनी राणा यांना दिला आहे.
मोदींच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणा जेणेकरून त्यांनी 15 लाख रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पुर्ण होईल, असा टोलाही भास्कर जाधव यांनी राणा यांना लगावला आहे. देशात महागाई वाढत आहे नागरिकांना त्रास होत असल्यानं राणा यांनी मोदींना साकडं घालावं, असं देखील जाधव म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या कारणानं राणा दाम्पत्यावर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयानं राणा दाम्पत्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी?, देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप, म्हणाले…
रोंगाली बिहू कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा जलवा, पारंपारिक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल
युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची शेवटची खेळी?, धक्कादायक माहिती समोर
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.