बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाधवांचा आवाजच ‘राउडी राठोड’सारखा आहे; चिपळूणमधील ‘त्या’ महिलेची प्रतिक्रिया

रत्नागिरी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना आमदार भास्कर जाधव हे देखील गेले होते. मात्र, चिपळूण बाजारपेठेत नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या एका महिलेला दमदाटी केल्याचा आरोप भास्कर जाधव यांच्यावर केला जात आहे. याप्रकरणी जाधवांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. अशातच आता बाजारपेठेतील प्रकरणावर संबंधित महिलेने प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर या महिलेने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने बाजारपेठेत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. जाधव यांनी अरेरावी केली नाही. त्यांचा आवाजच राउडी राठोडसारखा आहे, असं या महिलेनं म्हटलं आहे.

चिपळूणमधील ती महिला माध्यमांशी बोलताना म्हणाली की, भास्कर जाधव यांचे आणि आमचे गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. मुख्यमंत्री भेटीसाठी आले तेव्हा मी खूप भावूक झाले होते. त्यांनी माझ्या मुलाला वडिलधाऱ्या व्यक्तीच्या नात्याने सांगितलं.

तसेच त्यांनी अरेरावीची भाषा केली नाही. त्यांचा आवाजच राउडी राठोडसारखा आहे, त्यामुळे गैरसमज झाला असेल. ते नेहमीप्रमाणे हातवारे करून बोलत होते, असं देखील या महिलेने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दाैरा रद्द; विशेष विमानाने मातोश्रीकडे रवाना

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पुणे पोलिसांनी दिलं चांगलंच बड्डे गिफ्ट!

“मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?”

“दिवसभर सायकल चालवून भाजपसाठी काम केलं, तेव्हा…”

सिंहगडच्या पायथ्याशी हॉटेलमध्ये डान्स पार्टी; पोलिसांनी 11 जणांना शिकवला धडा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More