बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भास्कर जाधव यांना संरक्षण देणार’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई | काल विधानसभेत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी गदारोळ घातला. आज पुन्हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरला आहे. भाजपने कामकाजावर बहिष्कार केला आहे. विधानमंडळ परिसरात भाजपकडून प्रतिविधानसभा भरवण्यात आली होती. त्यावर सभागृहात देखील चर्चा झाली. काल अध्यक्षांच्या सभागृहात झालेल्या गोंधळावर भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं आहे.

विरोधी पक्षनेते लालबुंद होऊनच अध्यक्षांच्या दालनात आले. सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही म्हणून ते माझ्यावर रागावलेले होते. मी त्यांच्याशी बोलतच होतो, तेवढ्यात  भाजपचे काही आमदार आत घुसले, त्यांनी मला अश्लिल शिवीगाळ केली. राडेबाजांसारखे ते तुटून पडले, अशा शब्दांत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी तक्रार मांडली.

मी आतापर्यंत कोणतही संरक्षण घेतलं नाही. माझ्यासोबत एक साधा काॅन्सटेबल सुद्धा नाही. मी संरक्षण देखील मागणार नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत्यांनी आणि आमदारांनी मला धमकी दिली. मी कोणालाही शिवी दिली नाही. एक साधा असंसदीय शब्द जरी मी वापरला असेल तर तुम्ही ते सिद्ध करा, सीसीटीव्ही फुटेज तपासा, तसे काही आढळले तर तुम्हाला होईल तीच शिक्षा मी स्वत:साठी घेईन, असंही भास्कर जाधव म्हणाले.

त्यांच्या बोलण्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणावर आणि अध्यक्षांच्या भाषणावर भाष्य केलं. फोन टॅपिंग प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून योग्य न्याय देण्यात येईल तर, तालिका अध्यक्षांना त्यांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना संरक्षण देण्यात येईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते; त्यांच्याच हातात फुटला”

भास्कर जाधव पुन्हा तालिका अध्यक्ष; प्रतिविधानसभेवर तालिका अध्यक्षांची कारवाई

विधानमंडळ परिसरात भाजपची ‘प्रतिविधानसभा’; कालिदास कोळंबकर प्रतिविधानसभेचे अध्यक्ष

“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा”

“ठाकरे सरकारचा हा बालिशपणा; लढायचं असेल तर मैदानात लढा”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More