बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भास्कर जाधव पुन्हा तालिका अध्यक्ष; प्रतिविधानसभेवर तालिका अध्यक्षांची कारवाई

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल केली. यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यानंतर आता भाजपने आक्रमक पाऊल उचलत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे.

विधानसभेबाहेर विनापरवानगी स्पिकर लावण्यात आले आहेत त्यावर कारवाई करण्यात यावेत, अशी मागणी सभागृहात करण्यात आली होती. तर विरोधकांना सभागृहात बोलण्यात यावं, अशी मागणी देखील सभागृहात होती. त्यानंतर अध्यक्षांनी कारवाईचे आदेश दिले. भास्कर जाधव पुन्हा तालिका अध्यक्ष बनले आहेत.

अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्यात आली आहे. मार्शलांना बोलवून भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई केली. त्यानंतर फडणवीसांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. सरकार तानाशाही करत असल्याचं आरोप त्यांनी केला आहे.

12 आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईवर भाजपने हे पाऊल उचललं होतं. विधानमंडळ परिसरात भाजपकडून प्रतिविधानसभा भरवण्यात आली होती. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले होतं. तर त्याचबरोबर त्या ठिकाणी  खुर्ची, टेबल, माईकची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना रुग्णसंख्येची 111 दिवसांतील निच्चांकी नोंद

युनियनच्या गुंडगिरीला ‘राम कदम’ जबाबदार; राजू सापते आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचा धक्कादायक आरोप

“भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या, आश्चर्य वाटतं की त्यांनी कपडे का नाही फाडून घेतले”

आयपीएलची रंगत आणखी वाढणार; आयपीएलमध्ये 8 नाही तर आता 10 संघ खेळणार

‘या’ जिल्ह्यातील तब्बल 333 ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More