Top News औरंगाबाद महाराष्ट्र

मुलीचा धक्कादायक पराभव पण भास्कर पेरे पाटलांना नाही खंत, कारण…

औरंगाबाद | राज्यात काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये सर्वांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे पाटोद्याच्या आदर्श सरपंच असलेल्या भास्करराव पेरेंच्या गावच्या निकालावर. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भास्करराव पेरेंच्या मुलीचा पराभव झाला. यावर भास्कररांवानी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मला माझ्या मुलीचा पराभव धक्कादायक नाही. कारण या देशाने इंदिरा गांधीसारख्या नेत्यांचाही पराभव पाहिला आहे, असं भास्करराव आपल्या मुलीच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना बोलले.

आपल्याकडे बुद्धीवंत आणि समजणारांची कमतरता आहे. माझ्या मुलीकडे एक मुलगी म्हणून पाहू नका. गावातून निवडूण आलेले सर्वजणच आपलेच असल्याचं भास्करराव म्हणाले.

दरम्यान,  मुलीची इच्छा होती म्हणून तीने निवडणूक लढवली. त्यात 10-12 मतांनी तिचा पराभव झाला. त्यात विशेष काही नाही. यातून खूप काही शिकायला मिळतं. माझाही एकदा पराभव झाला होता, असंही भास्कररावांनी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”

“मी मोदी सरकारला घाबरत नाही हे लोक मला हात लावू शकत नाहीत पण…”

“काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकतं?”

‘तुमचीच वाक्य तुम्हाला कशी खायला आवडतील??…चपाती की डोसा?;’ भारताच्या विजयानंतर महिंद्रांचं हटके ट्विट

“शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या