बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते ‘शरद पवार’ तूर्तास वामकुक्षी घेतायत का?”

मुंबई | साकीनाका येथील बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर विरोधी पक्षान ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. साकीनाका घटनेच्या अत्याचारप्रकरणी मोहन चौहान या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे. अशातच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

साकीनाका बलात्काराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. या घटनेबाबत शरद पवार यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं भातखळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.

इकडच्या तिकडच्या फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?, असा टोला भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर लगावला आहे. पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. हे  प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे पीडितेला लवकर न्याय मिळवून दिला जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

बाबो! रिलेशनमध्ये येताना महिलेनं 17 पानी काॅन्ट्रॅक्ट लेटर करत केल्या ‘या’ रोमँटिक मागण्या!

…म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण!

साकीनाकाच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले…

‘या घटनेवर राजकारण करणं म्हणजे मृत्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’; संजय राऊत विरोधकांवर संतापले

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता- राजनाथ सिंह

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More