Ajit Pawar l विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांनी उडी घेतली आहे. अशातच आता राज्याच्या विधानसभा निडणुकीच्या पाश्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर देखील करत आहेत. मात्र आता अभिनेते भाऊ कदम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार? :
विनोदाचा बादशहा भाऊ कदम यांनी अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. सध्या त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एक्सवर फोटो देखील शेअर केला आहे.
सर्वत्र विधानसभा निडणुकीच्या चर्चा रंगलेल्या असताना भाऊ कदम आणि अजित पवार यांची भेट घेतली आहे. मात्र हा चर्चेचा विषय ठरत आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत अभिनेते भाऊ कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार असल्याची चर्चा आता जोर धरत आहेत. मात्र आता भाऊ कदम यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये अधिकृत पक्षात प्रवेश केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar l सूरज चव्हाण अजितदादांच्या प्रचारसभेत :
भाऊ कदम यांच्या भेटीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारसभेत ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण सहभागी झाला होता. मात्र यावेळी तोंडाला मास्क लावून सूरज चव्हाण सभेच्या ठिकाणी आला होता. यावेळी अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देत बिग बॉस फेम सूरज चव्हाणचं मंचावर देखील स्वागत केलं आहे.
News Title : Bhau kadam meet ajit pawar at devagiri
महत्वाच्या बातम्या –
उद्धव ठाकरेंनी 5 नेत्यांची केली हकालपट्टी; ‘या’ नेत्यांचा समावेश
माजी खासदाराचा भाजपला रामराम; आता शिंदेंच्या उमेदवाराला देणार आव्हान
राज्यात कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले? पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर
गुड न्यूज! दिवाळी सरताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर