Bhaubeej 2024 | देशभरात सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. काल 1 नोव्हेंबररोजी लक्ष्मीपूजन पार पडले. तर, उद्या 3 नोव्हेंबररोजी भाऊबीज हा सण साजरा केला जाईल. हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याला वाहिलेला सण आहे. असं म्हटलं जातं की, या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता आणि तेथे त्याच्या बहिणीने त्याचा खूप आदर केला होता, यामुळे यम प्रसन्न झाला आणि तिला वरदान दिले. (Bhaubeej 2024)
त्यामुळे दिवाळीच्या काळात बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याचे औक्षण करत असते. तर, भाऊ बहिणीला काहीतरी खास गिफ्ट देऊन तिला खुश करण्याचा प्रयत्न करतो. तसेच, बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. या भाऊबीजेला तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी काहीतरी खास गिफ्ट शोधत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच कामी येईल.
बहीणींना द्या ‘हे’ मस्त गिफ्ट्स
कानातले झुमके : तुम्ही तुमच्या बहिणीसाठी कानातले खरेदी करू शकता, कानातले प्रत्येक प्रकारच्या बजेटमध्ये खरेदी करता येतात आणि मुलींनाही ते खूप आवडतात. तुम्हाला ऑनलाइनही त्याची मस्त डील करता येईल. (Bhaubeej 2024)
बॅग : मुलींचे हँडबॅग बद्दल एक वेगळेच आकर्षण असते.बॅग ही एक अशी वस्तू आहे ज्याची मुलींना त्यांच्या दैनंदिन जीवनात गरज असते. त्यामुळे तुम्ही भाऊबीजच्या दिवशी तुमच्या बहिणीला बॅग भेट म्हणून देऊ शकता.
फोटो फ्रेम : तुम्ही बहिणीला तिचा किंवा तुमचा आणि बहिणीचा एखादा मस्त फोटो फ्रेम करून गिफ्ट देऊ शकता. तुमच्या बहिणीला ही भेट नक्कीच आवडेल. (Bhaubeej 2024)
इमिटेशन ज्वेलरी : सध्या दागिन्यांपेक्षा इमिटेशन ज्वेलरीला जास्त पसंती दिल जाते. मुली प्रत्येक ड्रेस किंवा साडीनुसार ज्वेलरी पसंत करत असतात. त्यामुळे त्यांना भाऊबीजला गिफ्ट म्हणून तुम्ही इमिटेशन ज्वेलरी देऊ शकता. (Bhaubeej 2024)
News Title – Bhaubeej 2024 gifts for sister
महत्त्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणविसांच्या जीवाला धोका?, सुरक्षेत करण्यात आली मोठी वाढ
शरद पवारांचा महायुतीवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले..
विधानसभेत महाविकास आघाडी मारणार बाजी?, सर्व्हेतून मोठी माहिती समोर
दिवाळी पाडव्याला मिळाली आनंदवार्ता, सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर
बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा होणार?; पार्थ पवारांकडून मोठा खुलासा