सोलापूर | शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यानं बार्शीतील महिला आघाडीच्या कार्यकर्त्या दंडवत घालणार असल्याचं माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
तानाजी सावंत यांना मंत्रिपद हे दिलं गेलंच पाहिजे, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे. याकरिता शिवतीर्थापासून ते मातोश्रीपर्यंत दंडवत घालत जाणार आहोत. बार्शी तालुक्याच्या वतीनं महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि सर्व पदाधिकारी जाणार असल्याचं भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सावंतानी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डावलण्यात आल्याचं कारण विचारलं. ठाकरेंच्या उत्तराने समाधानी न झाल्याने सावंतांनी पुन्हा कधीही मंत्रिपदासाठी मातोश्रीवर येणार नाही, असं म्हटलं. यावर उद्धव ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत निरोप दिल्याचं कळत आहे.
दरम्यान, सावंत यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात तिवरे धरण फुटले होते. त्यावेळी खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटले अशी अजब प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यामुळे शिवसेनेवर मोठी टीका झाली होती.
संबंधित बातमी-
उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांना ‘जय महाराष्ट्र’; मातोश्रीवर उडाले खटके?
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्यानं दिली आपल्या प्रेमाची कबुली; पाहा कोण आहे ती… – https://t.co/nSM5xHFr2G @hardikpandya7 @Natasastankovic #HardikPandya
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
‘सध्या त्यांना तेवढंच कामं आहे’; फडणवीसांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार – https://t.co/AVNdydR2tP @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
मंत्रिपद न दिल्याने ‘हा’ काँग्रेस आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत?- https://t.co/93Nmru32d4 #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.