बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे गटाचं समर्थन भावना गवळींच्या अंगलट?, शिवसेनेनं प्रतोद पदावरून केली उचलबांगडी

मुंबई | आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा झटका बसला असताना आता शिवसेनेचे खासदारही नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेना खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित शिंदे गटाच्या बाजूने निर्णय घेण्याची विनंती केली होती.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेनेनं भावना गवळी यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या लोकसभा प्रतोद पदावरून भावना गवळी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शिंदे गटाचं समर्थन केल्याने भावना गवळींवर ही कारवाई केल्याच्या सध्या चर्चा आहेत.

बंडखोरांवर कारवाई न करता आता निर्णय घ्यावा, असं भावना गवळी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हणाल्या होत्या. शिवसेनेचे हे सर्व शिलेदार आधी हाडामासाचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेऊन कोणतीही कारवाई न करता शिवसेनेसाठी निर्णय घ्यावा, अशी विनंतीही भावना गवळी यांनी केली होती.

दरम्यान, भावना गवळी यांच्या या भूमिकेमुळे त्यांना प्रतोद पदावरून हटवलं असल्याचं म्हटलं जात आहे. तर आता भावना गवळींच्या जागी शिवसेनेच्या लोकसभा प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहित कळवले आहे. तर शिवसेना संसदीय पक्षाने तातडीने ही नियुक्ती केली असल्याचं देखील राऊतांनी या पत्रात नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शिंदे-फडणवीसांची जोडी फेविकॉल पेक्षाही घट्ट”

‘योग्य वेळ पाहिली आणि…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!

‘…तर राजकारण सोडून घरी बसेन’; शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More