बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पॅराऑलिम्पिकमध्ये भाविनाची ऐतिहासिक कामगिरी; भारताचं पदक निश्चित

टोकियो | जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 7 पदकं आपल्या नावावर केली. त्यानंतर आता टोकियोमध्ये पॅराऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावावर आता एक पदक निश्चित झालं आहे.

भारताच्या भाविना पटेलने महिला टेबल टेनिसच्या चौथ्या वर्गातील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सलग तीन सामने जिंकत तिने सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिस पॅरा खेळाडू ठरली आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानं आता तिचं कांस्यपदक निश्चित झालंय.

ब्रिटनच्या मेगन शॅकलटन या खेळाडूसोबत भाविना पटेलचा सामना रंगला. पहिला सेट 11-7 असा जिंकत भाविनाने आघाडी मिळवली. मात्र, शॅकलटनने पुन्हा पुनरागमन करत पुढचा सेट 9-11 असा जिंकला. त्यानंतर सामन्यात चांगलीच चुरस निर्माण झाली. त्यानंतर भाविनानं 17-15 आणि 13-11 असे दोन सेट जिंकत सामना जिंकला आणि पदकही निश्चित केलं.

दरम्यान,सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर भाविनाला अश्रू अनावर झाले. याआधी जगातील नंबर दोनची खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिला भाविनाने 3-0 अशी मात केली होती. त्यामुळे आता भाविनाकडून सुवर्णपदकाच्या देखील आशा उंचावल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘आम्ही सुद्धा संयमानं बाॅम्ब टाकणार’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

“छगन भुजबळ, वडेट्टीवार, मुंडेंसारखे मंत्री तोंडाला डिंक लावल्यासारखे गप्प”

….म्हणून पंचांनी हटवली रिषभ पंतच्या ग्लोव्हजवरची पट्टी; पाहा व्हिडीओ

लोक सूज्ञ, कोणतंही सरकार कायम नसतं- अमित ठाकरे

उद्यापासून 4 दिवस बँका बंद; जाणून घ्या कारण!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More