भय्यूजी महाराज विवाहबंधनात, डॉ. आयुषी यांच्याशी विवाहबद्ध

इंदौर | अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज पुन्हा विवाहबंधनात अडकले आहेत. डॉ. आयुषी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. इंदौरला हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. आप्तेष्ट आणि भय्यूजी महाराजांच्या जवळची काही मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती.

दरम्यान, दोन वर्षापूर्वी भय्यूजी महाराज यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांना कुहू नावाची 13 वर्षांची मुलगीही आहे. मात्र आई आणि बहिणीच्या आग्रहामुळे भय्यूजी महाराज या लग्नासाठी तयार झाल्याचं सांगण्यात येतंय.

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या