बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोगराई, राजकारण, पाऊस…, वाचा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत?

बुलडाणा | 350 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जारी करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊस, राजकारण, रोगराई असं वर्षभराचं भाकित केलं जातं. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मंगळवारी संध्याकाळी ही घट मांडणी पार पडली आणि अखेर त्याचं भाकित जारी करण्यात आलं आहे.

यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असून जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल, असं भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आलं आहे. अवकाळी पाऊस वर्षभर राहणार असून बळीराजाला यंदाही अवकाळीचा सामना करावा लागणार आहे. तर भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, राज्यात रोगराई राहणार नाही. त्यामुळे यंदा कोरोनाचा नायनाट होण्याची शक्यता आहे.

देशाच्या राजाची गादी कायम राहणार आहे. सत्ता पालट होणार नाही, असं भेंडवळच्या भविष्यवाणीतून समोर आलं आहे. तर देश यंदा आर्थिक संकटात नसेल. देशाचं संरक्षण चांगलं राहणार असून देशाच्या संरक्षण खात्यावर जास्त दबाव राहणार नाही, असा अंदाजही भेंडवळच्या घट मांडणीतून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा देशात पीक चांगलं येईल, मात्र पिकांना भाव मिळणार नाही. तसेच लवकर येणाऱ्या पिकांच नुकसान होण्याची शक्यता आहे, असा अंदाज देखील भेंडवळच्या भविष्यवाणीतून वर्तवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार की बाळासाहेबांचं?”

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पोलिसांचा झटका

‘तुझ्यात जीव रंगला’! अखेर अक्षया आणि हार्दिकचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

“मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून…”; इम्तियाज जलील यांची जहरी टीका

मुंबई पोलिसांकडून ‘इतक्या’ मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More