भाजप सरकारकडून संभाजी भिडेंची पद्मश्रीसाठी शिफारस

मुंबई | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोप असलेल्या संभाजी भिडे यांची भाजप सरकारने 2015 साली पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली होती. हिन्दुस्थान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय. 

प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखालील 10 ज्येष्ठ मंत्र्यांच्या गटाने यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. भिडेंसह आणखी 15 जणांची शिफारस करण्यात आली होती. 

दरम्यान, संभाजी भिडेंनी मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आलीय.