बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पुणे | गेल्या 24 तासात पुण्यात पावसाने थैमान घातलं आहे. सध्या खडकवासला धरणातून 18,491 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर त्याचबरोबर खडकवासला धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आता पुण्यातील प्रसिद्ध असलेला भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. भिडे पुला पाण्याखाली गेल्यावर सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. कारण भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतरच पुण्यात पाऊस पडल्याची जाणीव पुणेकरांना होते.

भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं आज नेटकऱ्यांना सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. भिडे पूलच्या मिम्स सोशल मीडियावर तुफान शेअर केल्या जात आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भिडे पूल पाण्याखाली जाणार असून नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशा सुचना केल्या होत्या. त्यावर ‘भिडे पूल..अजूनही पाण्याखाली नाही म्हणजे पुणे कोरडेच’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर भिडेप पूल पाण्याखाली नाही म्हणजे अजून पुण्यात पावसाळा आला नसल्याचं एकानं म्हटलंय.

खडकवासला धरणातून 18,491 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून एकानं म्हटलं. की, ‘हैलो भिडे पुल… तु ऐकतोय ना? तु तयार रहा अर्थात बुडायला’. भिडे पूल पाण्याखाली जाणं म्हणजे पुण्याची परंपरा असल्याचं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. तर एकाने ‘अरर् तु  पाऊस आहे की संतान अशी मिश्किल कमेंट केली आहे. तर एकाने अंडरटेकरचा फोटो वापरून मीम शेअर केलं आहे. हे सर्व मिम्स सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

दरम्यान, खडकवासला धरण तुडूंबं भरल्यानं अवघ्या 7 तासांत धरणातील पाण्याचा विसर्ग 2400 क्युसेकवरून 25036 पर्यंत वाढवत न्यावा लागलाय. रात्रीतून खडकवासला धरणाचा विसर्ग तब्बल 25 हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाहा मिम्स-

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“लस काय झाडाला लागल्यात का? केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची पहिली पोस्ट, म्हणाली….

तरूणीच्या विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत; ऑडिओ क्लिप व्हायरल

राज्य सरकारमुळे कोकणात पूरस्थिती- प्रवीण दरेकर

भारताला मिळू शकते आणखी एक लस; ‘या’ लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

‘एमपीएससी’चा मोठा निर्णय!; ‘या’ उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More